A i>

Saturday, June 26, 2021

SSC निकाल अपडेट

 SSC  निकाल अपडेट २०१८ पूर्वीच्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या श्रेणी  भरण्याबाबत  

 2018 पूर्वीच्या श्रेणी विषयाबाबत राज्य मंडळाकडून दिलेला खुलासा  खालीलप्रमाणे 

  1.  जुने ग्रेडचे विषय  दाखवता येणार नाहीत. 
  2.  उपलब्ध 3 ग्रेडमध्ये विषयामध्ये  विषय सुटला असल्यास  E - exemption 
  3. व घेतलेला नसल्यास , N - not offered दर्शविणे 

श्रेणी विषयाची श्रेणी भरताना वरील प्रमाणे पर्याय दिसतात त्यातील वरील सूचनांच्या अनुसार   लागू असणारा पर्याय निवडावा 



SSC निकाल साहित्य वितरण केंद्रावर जमा करणे बाबत  ⚾ 
            
             



🎾 SSC निकाल महत्त्वाचे गुण भरणे, रिपोर्ट पाहणे, Excel फाईल डाऊनलोड करणे, गुण  तपासणे व कन्फर्म करणे बाबतची कार्याखालील प्रमाणे करावी 🎾 

ऑनलाईन माहिती भरून झाल्यावर रिपोर्टला क्लिक करा.  रिपोर्ट दिसेल.  वरील बाजूस download Excel दिसेल ते download करा.  यात 50+30 ( 25+15 भाग1 & 2 बाबत ) यांची बेरीज v अंतर्गत 20 असे स्वतंत्र गुण दिसतील.  एकूण विषय निहाय गुण दिसणार नाहीत.  नोंदी तपासून पहाव्यात  चूक लक्षात आल्यास Refill करावे आणि मगच तपासून confirm करावे. 


 

Tuesday, June 22, 2021

शाळांना SSC निकाल भरण्यासाठी लिंक आजपासून सुरु होणार

राज्यमंडळाच्या SSC निकाल भरण्यासाठी सुविधा आज दिनांक २३ जून पासून सुरु होणार असल्याचे राज्य मंडळाचे वतीने जाहीर करण्यात आले असून मंडळाने याबाबत करावयाच्या कार्यावाही बाबत सूचनाही जारी केल्या आहेत. शाळांनी दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे गुण भरणे आवश्यक आहे.

23 जुन ते 02 जुलै या कालावाधीमध्ये  विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या वेबसाईटवर शाळा लॉगीन करून दिलेल्या टॅब मध्ये भरावयाचे आहेत.  

यासाठी मंडळाच्या वेबसाईट खालील प्रमाणे.

https://mh-ssc.ac.in/

http://mahahsscboard.in 


मंडळाचे परिपत्रक खालील प्रमाणे 




Monday, June 21, 2021

मुख्याध्यापक महामंडळाच्या एसएससी निकाल शंका समाधान व चर्चा वेबिणारला उदंड प्रतिसाद

मुख्याध्यापक महामंडळाच्या एसएससी निकाल शंका समाधान व चर्चा वेबिणारला उदंड प्रतिसाद 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने एसएससी निकाल 2021 तयार करण्यासंबंधी येणाऱ्या अडचणी व त्यावर चर्चा आणि शंका समाधान यासंबंधी वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास महाराष्ट्रातील जवळपास नऊ हजार शिक्षकांनी झूम व यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन उपस्थिती लावली. महामंडळाच्या या सेवेचा लाभ घेतल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष जे.के. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.सदर ऑनलाईन चर्चासत्रामध्ये एसएससी परीक्षेचा निकाल तयार करण्यासंबंधी आलेल्या अडचणींचा मागोवा घेण्यात आला व त्यावरती कोणती कार्यवाही करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

सदर ऑनलाइन चर्चासत्रामध्ये एसएससी बोर्डाचे राज्य सचिव डॉ. अशोक भोसले सहभागी झाले होते, त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी विचारलेल्या समस्यांबाबत नेमकी कोणती कार्यवाही करावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महामंडळाच्या वतीने अध्यक्ष जे.के पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे,सचिव शांताराम पोखरकर, प्रवक्ता महेंद्र गणपुले, माजी अध्यक्ष अरुण थोरात, सदस्य संजय पाटील, आदिनाथ थोरात, भरत मोझर, संदेश राऊत, बी बी पाटील,सचिन नलवडे विजय पाटील, अमृत पांढरे यांनी सहभाग घेतला.

सदरच्या वेबिनारचे लाइव्ह प्रक्षेपण मुख्याध्यापक महामंडळाच्या यूट्यूब चाॅनेल  वरून करण्यात आले असून आतापर्यंत  जवळपास ३७,४६६ लोकांनी या व्हिडीओ ला भेट दिलेली आहे . एसएससी निकाल तयार करण्यासंदर्भात काही अडचणी असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून सदरचा व्हिडिओ पहावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://youtu.be/nFcSBlohkRA


Saturday, June 19, 2021

 SSC निकाल २०२१ -  शंका समाधान व चर्चा यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने वेबिणारचे आयोजन 

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने SSC  निकाल तयार करताना येणाऱ्या शंका व त्यावर चर्चा करणे साठी   रविवार दिनांक २० जून २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता झूम वेबिनारचे  आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व दहावीला शिकवणारे शिक्षक यांनी सदर वेबिनारला उपस्थित राहून आपले प्रश्न विचारावेत, त्या प्रश्नाना महामंडळाचे तज्ञ  उत्तर देतील. महामंडळाच्या या उपक्रमाचा लाभ राज्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा असे आवाहन राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील यांनी केले आहे.

या वेबिणार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

झूम वरती सहभागी होण्यासाठी लिंक

 https://us02web.zoom.us/j/89130293865?pwd=L1JFWGwwUkVIdGR2YVVQWXBRSEFCUT09

 युटूब लिंक

https://youtu.be/nFcSBlohkRA

वेबिणार मध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपले प्रश्न झूम वर प्रत्यक्ष विचारावेत किंवा चाट बॉक्स मध्ये लिहावेत तर युट्युब वर चाट मध्ये टाकावेत.