A i>

Monday, June 21, 2021

मुख्याध्यापक महामंडळाच्या एसएससी निकाल शंका समाधान व चर्चा वेबिणारला उदंड प्रतिसाद

मुख्याध्यापक महामंडळाच्या एसएससी निकाल शंका समाधान व चर्चा वेबिणारला उदंड प्रतिसाद 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने एसएससी निकाल 2021 तयार करण्यासंबंधी येणाऱ्या अडचणी व त्यावर चर्चा आणि शंका समाधान यासंबंधी वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास महाराष्ट्रातील जवळपास नऊ हजार शिक्षकांनी झूम व यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन उपस्थिती लावली. महामंडळाच्या या सेवेचा लाभ घेतल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष जे.के. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.सदर ऑनलाईन चर्चासत्रामध्ये एसएससी परीक्षेचा निकाल तयार करण्यासंबंधी आलेल्या अडचणींचा मागोवा घेण्यात आला व त्यावरती कोणती कार्यवाही करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

सदर ऑनलाइन चर्चासत्रामध्ये एसएससी बोर्डाचे राज्य सचिव डॉ. अशोक भोसले सहभागी झाले होते, त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी विचारलेल्या समस्यांबाबत नेमकी कोणती कार्यवाही करावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महामंडळाच्या वतीने अध्यक्ष जे.के पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे,सचिव शांताराम पोखरकर, प्रवक्ता महेंद्र गणपुले, माजी अध्यक्ष अरुण थोरात, सदस्य संजय पाटील, आदिनाथ थोरात, भरत मोझर, संदेश राऊत, बी बी पाटील,सचिन नलवडे विजय पाटील, अमृत पांढरे यांनी सहभाग घेतला.

सदरच्या वेबिनारचे लाइव्ह प्रक्षेपण मुख्याध्यापक महामंडळाच्या यूट्यूब चाॅनेल  वरून करण्यात आले असून आतापर्यंत  जवळपास ३७,४६६ लोकांनी या व्हिडीओ ला भेट दिलेली आहे . एसएससी निकाल तयार करण्यासंदर्भात काही अडचणी असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून सदरचा व्हिडिओ पहावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://youtu.be/nFcSBlohkRA


No comments:

Post a Comment