A i>

Thursday, October 13, 2022

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ अधिवेशन २०२२




 महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ अधिवेशन २०२२

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ अधिवेशन अहमदनगर येथे दिनांक ६ व ७  नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजित आहे.महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या या वार्षिक स्नेहमेळाव्यास व ज्ञानयज्ञास भेट देण्याचे नियोजन मुख्याध्यापक बंधू-भगिनी यांनी करावे. 

सदर अधिवेशनाचेआयोजन आहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात येत असून या अधिवेशनामध्ये शोध निबंधाचे सादरीकरण, माध्यमिक शाळा समोरील समस्यांचा आढावा, त्यासाठी शासन दरबारी केलेल प्रयत्न व भविष्यातील महामंडळाच्या कार्याची  दिशा याबाबत चर्चा केली जाणार आहे. अधिवेशनामध्ये विविध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनामध्ये विविध शैक्षणिक ग्रंथांचे स्टाॅल ही  लागणार आहेत. तरी मुख्याध्यापक बंधू-भगिनी यांनी सदर अधिवेशनास संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्यामाध्यामिक मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या वतीने करण्यात करण्यात आहे. 

No comments:

Post a Comment