A i>

Tuesday, May 21, 2024

मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतीसत्र  -  २०२३/२४ निमंत्रण पत्रिका 


 

आग्रहाचे निमंत्रण 

 

   कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर
==========================================================

 

मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतीसत्र  -  २०२४/२५ चे आयोजन कोल्हापूर
२०२४ रोजी गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठवडगाव ता.हातकणंगले या ठिकाणी करण्यात आले आहे.

या कृतीसत्राचे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने उत्तम नियोजन केले असून आपण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने कौन्सिल मुख्याध्यापक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे ही विनंती व आवाहन आम्ही करत आहोत.
 या कृतीसत्राची काही खास वैशिष्ट्ये  आहेत. 

 १ ) आपण हे कृतीसत्र ज्या विद्यालयात  घेत आहोत हे विद्यालय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त आहे. त्यामुळे एक उपक्रमशील, स्वच्छ , सुंदर शाळा आपण पहाणार आहात. गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज  हे महाराष्ट्रातील एक नामांकित शैक्षणिक केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केलेला शैक्षणिक परिसर आहे.
 २ ) या कृतीसत्रासाठी आपली उत्तम निवास व्यवस्था केली आहे. गादी,उशी , बेडशीट,ब्लॅंकेट  देण्यात येईल. 
३ ) अंघोळीसाठी गरम व गार पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
 ४ ) महिला मुख्याध्यापिकांसाठी  निवासाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली आहे.

 ५ ) कृति सत्रातील दोन्ही शोधनिबंध अभ्यासपूर्ण तयार केले असल्याने त्यांचे उत्तम वाचन होईल व आपणास चर्चेत सहभागी होता येईल.
 ६ ) जेष्ठ साहित्यिक ,प्राचार्य, डॉ.सुनिलकुमार लवटे हे   NEP - 2020 माध्यमिक शिक्षण या विषयावर 
 अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. तर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.डॉ.एकनाथ आंबोकर हे दुरदृष्टी असलेले अभ्यासू शिक्षणाधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेले अधिकारी आपणास मार्गदर्शन करणार आहेत.
 ७ ) या विद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस.घुगरे यांच्याशी  गुणवत्ता व प्रशासन या संदर्भात संवाद करता येईल या शै.कृतीसत्रातून आपण एक चांगली बौद्धिक मेजवानी घेऊन जालं असा आम्हाला विश्वास वाटतो.
 ८ ) आमचा कोल्हापूरी पाहूणचार आम्ही उत्तम करु. कोल्हापुरी मिसळ, तांबडा पांढरा रस्सा स्मरणात राहील 
९) कृती सत्रानंतर पर्यटनासाठी आपण जाऊ शकाल. कोल्हापूर जिल्हा हा विविध पर्यटन वैशिष्ट्याने नटलेला आहे. महालक्ष्मी मंदिर. राजवाडा, रंकाळा तलाव, किल्ले पन्हाळा, कणेरी मठ म्युझियम, टाऊन हॉल म्युझियम, शिवाजी विद्यापीठ परिसर, राधानगरी अभयारण्य, नरसिंग वाडीचे दत्त मंदिर, अति प्राचीन शिल्पकलेचे वैभव असलेले खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, बाहुबली परिसर, रामलिंग यासारख्या अनेक पर्यटन स्थळेही प्रवासादरम्यान आपल्याला पाहता येतील.

आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे वतीने आपणास आम्ही करत आहोत.
आपले नम्र 

 

अध्यक्ष/सचिव
मुख्याध्यापक संघकोल्हापूर.



No comments:

Post a Comment